तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत देवखेरकी विद्यालयाचे घवघवीत यश…
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत
देवखेरकी विद्यालयाचे घवघवीत यश…
चिपळूण – चिपळूण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच डेरवण येथील स्टेडियमवर पार पडल्या. 17 वर्षाखालील वयोगटामध्ये देवखेरकी विद्यालयाचा संघ तालुकास्तरावर उपविजेता ठरला. सलग दोन वर्षे देवखेरकी विद्यालयाची खो.खो स्पर्धेतील ही उल्लेखनीय कामगिरी आहे.
सुरुवातीला टेरव हायस्कूल त्यानंतर बांदल हायस्कूल आणि निवळी हायस्कूल या बलाढ्य संघांबरोबर लढत देऊन अंतिम सामना परांजपे हायस्कूल चिपळूण व देवखेरकी हायस्कूल यांच्यामध्ये झाला. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला.
देवखेरकी हायस्कूलच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मार्गताम्हणे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयजी नातू , सर्व पदाधिकारी, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती , देवखेरकी गावातील सर्व ग्रामस्थ, यांनी विद्यालयाचे कौतुक केले.
विद्यालयाच्या या सर्व खेळाडूंना सहाय्यक शिक्षक श्री. चव्हाण पाटील सर यांनी मार्गदर्शन केले.

