फटाके फोडणाऱ्या बुलेटवाल्यांचे चिपळूण पोलिसांना खुले आव्हान…
*चिपळूण पोलिसांना आव्हान*
चिपळूणचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना ‘फटाके फोडणाऱ्या’ बुलेटवाल्यांनी खुले आव्हान दिले आहे. हे आव्हान स्वीकारून पोलीस अशा बुलेटवाल्यांची हवा काढतात की त्यांच्यापुढे शरणागती पत्करतात याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
अनेक बुलेटवाल्यांनी मूळ सायलेंसरमध्ये बेकायदा बदल करुन चित्र विचित्र, भीतीदायक आवाज काढून उच्छाद मांडला आहे. चिपळूण शहरात अनेक चौकात पोलीस उभे असतात, एरवी अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असतात, पण फटाके फोडणारे बुलेटवाले त्यांना का दिसत नाहीत… फटाके फोडत येणाऱ्या बुलेटचा आवाज त्यान्च्या कानापर्यंत पोहचत नाही का…
चिपळूणचे कर्तव्यदक्ष dysp बेले साहेब, पोलीस इन्स्पेक्टर मेंगडे साहेब आणि एकंदरच पोलिसांना आवाहन आहे की या त्रासदायक, भीतीदायक बुलेटवाल्यांना चांगला धडा तरी शिकवा किंवा त्यांच्यापुढे शरण गेल्याचे जाहीर करा आणि लोकांना त्रास दिल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करा…
मकरंद भागवत, पत्रकार
आणि अनेक त्रस्त नागरिक.

