अनिकेत पटवर्धन म्हणजे अस्सल बुद्धिमत्तेचे बावनकशी सोने!

अनिकेत पटवर्धन म्हणजे अस्सल बुद्धिमत्तेचे बावनकशी सोने!

     *अस्सल बुद्धिमत्तेचे बावनकशी सोने : अनिकेत पटवर्धन*

 

 

** भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक आणि मूळचे रत्नागिरीतील भाजपचे कार्यकर्ते श्री. अनिकेत पटवर्धन यांच्या काम करण्याच्या सकारात्मक पद्धतीचा अनुभव घेतलेले पनवेल येथील समीर सप्रे यांचे मनोगत….**

 

 

▪️सध्याचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘AI’ चे आहे. एका बोटाच्या क्लिकवर अवघ्या विश्वाचे ज्ञान तळहातावर अवतरण्याचा हा आधुनिक काळ! माहितीच्या या महापुरात खरी कसोटी लागते ती मानवाच्या ‘अस्सल’ प्रज्ञेची, उपजत बुद्धिमत्तेची. यंत्रांच्या या जगात तुमच्याकडे जर अस्सल बुद्धिमत्तेचे बावनकशी सोने असेल, तर इतर कोणत्याही कृत्रिम झगमगाटाची तमा बाळगण्याचे कारण उरत नाही.

 

▪️अशाच एका अस्सल, बावनकशी सोन्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचा सहवास नुकताच लाभला… आणि खऱ्या अर्थाने आयुष्याचे सोने झाल्याची अनुभूती आली!

नाव ‘अनिकेत’… ज्याच्या नामातच ‘हे विश्वचि माझे घर’ अशी वैश्विक आणि उदात्त धारणा सामावलेली आहे. अथांग बुद्धिमत्ता आणि अमर्याद कार्यक्षमतेची निसर्गदत्त देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्त्व. कोणताही कृत्रिम आव न आणता सुस्पष्ट विचार, सहज संवाद आणि पारदर्शक मनाची श्रीमंती जपणारे आमच्या रत्ननगरीतील एक तळपते कोकणरत्न म्हणजेच

*श्री. अनिकेत पटवर्धन!*@152858053869595

 

▪️प्रत्यक्ष संवादातून माणसाचे अंतरंग अधिक तरलतेने उलगडते, याचा प्रत्यय या भेटीत आला. आजवरचा संपर्क केवळ फोन आणि व्हॉट्सॲपच्या पडद्यापुरताच मर्यादित होता.

 

▪️मी यापूर्वी सुचवलेल्या जनहिताच्या कामांना त्यांनी दिलेल्या तत्पर प्रतिसादावर मी पूर्वीही कृतज्ञतापूर्वक लिहिले होते. परंतु, यावेळी परमेश्वरकृपेने प्रत्यक्ष भेटीचा अनुपम योग आला; आणि भेटीनंतर एका क्षणाचाही विलंब न लावता लेखणी हातात घ्यावीशी वाटली, हेच या भेटीचे वेगळेपण!

 

▪️एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी आपल्या मनात तिची एक प्रतिमा रेखाटलेली असते. बऱ्याचदा कल्पनेचा हा मनोरा प्रत्यक्षात तितकासा खरा ठरत नाही, कधी अंदाज चुकतात तर कधी पदरी निराशा पडते. परंतु अनिकेतजींना भेटल्यावर माझी अवस्था *जैसा सोचा था, उससे कई गुना बेहतर*’ अशी झाली! अफाट विद्वत्ता आणि असीम क्षमतांची खाण असणारा माणूस जेव्हा तितक्याच नम्रतेने समोर येतो, तेव्हा केवळ थक्क व्हायला होते.

 

*प्रगल्भ सामाजिक भान*

 

▪️कर्तृत्वाच्या जोरावर यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करणारी अनेक माणसे आपण पाहतो. परंतु दुर्दैवाने, त्या उंचीवर पोहोचल्यावर अनेकांना आपल्या मुळांचा आणि सामाजिक बांधिलकीचा विसर पडतो; दृष्टिकोन संकुचित होतो. अनिकेतजी मात्र याला सन्माननीय अपवाद ठरतात.

 

▪️रत्नागिरीच्या कुशीतून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास यशाच्या क्षितिजावर पोहोचला तरी रत्नागिरी त्यांच्या अंतःकरणातून कधीच दूर झाली नाही. आपल्या मातीशी जोडलेली त्यांची नाळ आजही तितकीच घट्ट आहे. रत्नागिरीच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर ते अत्यंत सजगतेने आणि खंबीरपणे पाय रोवून उभे आहेत.

 

▪️देवरुखच्या ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा ऐतिहासिक निर्णय आपण सर्वांनीच अनुभवला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसाठी तिथे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, ही कित्येक वर्षांची लोकभावना होती. सरकारदरबारी लालफितीच्या कारभारात अडकलेला हा विषय संवेदनशीलतेने समजून घेणे, त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे आणि प्रत्यक्ष मंजुरीची मोहर उमटवून आणणे—हे केवळ आणि केवळ अनिकेत पटवर्धन यांच्यासारखा ध्येयवेडा माणूसच करू जाणे! स्वतःचा कोणताही राजकीय अथवा आर्थिक स्वार्थ नसताना, केवळ लोककल्याणाचा उदात्त ध्यास घेऊन झोकून देण्याची वृत्ती असल्याशिवाय अशी लोकोपयोगी कामे तडीस जात नाहीत. ‘आपल्या पदाचा, अधिकाराचा आणि प्रभावाचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठीच झाला पाहिजे’, ही निष्काम कर्मयोगाची भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून झळकते.

 

▪️ना माझी त्यांच्याशी जुनी ओळख, ना कुठले लागेबांधे; तरीही एका सामान्य नागरिकाच्या हाकेला त्यांनी आतापर्यंत चार-पाच वेळा दिलेला तत्काळ प्रतिसाद त्यांच्या प्रगल्भ संवेदनशीलतेची आणि लोकसंग्रहाची साक्ष देतो.

 

*राजकीय पटलावरील धुरंधर नेतृत्व*

 

▪️रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाचे कालचे अस्तित्व आणि आजचा सर्वदूर पसरलेला प्रभाव पाहिला, तर या नेत्रदीपक वाटचालीमागील कतृत्वाचे रहस्य आपोआप उलगडते. जिल्ह्यातील संघटनेला अभेद्य ताकद आणि नवे वैभव प्राप्त करून देण्यात अनिकेतजींचा सिंहाचा वाटा आहे, हे केवळ मीच नव्हे तर तळागाळातील प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता तितक्याच अभिमानाने मान्य करेल.

 

▪️मंत्रालयाच्या स्तरावर सामान्य कार्यकर्त्यांचे विषय कोण मार्गी लावणार? या पूर्वी अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाला अनिकेतजींच्या रूपाने एक भक्कम उत्तर मिळाले आहे. आज जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला अनिकेतजी म्हणजे हक्काचा आधारवड वाटतात. जिल्ह्यावरून गेलेले काम त्यांच्या हाती सोपवले, की ते काम पूर्णत्वास जाणारच हा कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास हीच त्यांची खरी ताकद आहे.

 

 

*💫अथांग जनसंपर्क, कार्यसिद्धीची अमर्याद क्षमता, संवादाचे अजोड कसब, यशाच्या शिखरावरही मातीशी जोडलेली कृतज्ञ वृत्ती, प्रखर सामाजिक भान, सूक्ष्म राजकीय मुत्सद्दीपणा आणि लोकहितासाठी अविश्रांत पाठपुरावा करण्याची अभेद्य जिद्द… या सर्व अष्टपैलू गुणांचा संगम पाहता, उद्या अनिकेत पटवर्धन यांनी विधिमंडळाचे अथवा मंत्रि‍पदाचे दालन भूषवले तर तिळमात्र नवल वाटणार नाही. उलटपक्षी, एका खऱ्या लोकनेत्याच्या कर्तृत्वाला आणि योग्यतेला मिळालेला तो न्याय असेल, हीच माझ्यासह तमाम जनतेची प्रामाणिक भावना आहे!*

 

 

©️समीर सप्रे/पनवेल

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *