‘वाशिष्ठी आणि सह्याद्रि’

*वाशिष्ठी आणि सह्याद्रि!*

 

लढले, भांडले…

एकमेकांवर तुटून पडले…

तुतारी फुंकली जोराने…

घड्याळाचे काटेही

धावले वेगाने…

 

पैशाच्या खेळात विकासकामेही

ठरली निरूपयोगी…

विजयाचे शिखर

सर करताना…

चांगलाच फेस

आला हेही खरे…

 

पण, मधल्या काळात

बहाद्दूरशेख पुलाखालुन

बरेच पाणी गेले आहे वाहून…

 

आता ‘सह्याद्रि’ आणि

‘वाशिष्ठी’ ला

एकमेकांची ओढ आहे…

सहकारचे शिखरही

गाठायचे आहे…

संस्थेची पतही

टिकवायची आहे…

 

अशावेळी ‘गणपती बाप्पा’

पावला आहे …

सह्याद्रीचा ‘वारस’

मदतीला आला आहे…

 

कार्यकर्त्यानो विसरा तो संघर्ष…

आणि मनाची तयारी करा…

भविष्यात

एकमेकांचा प्रचार करायचा आहे! प्रचार करायचा आहे!!

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

मो. 9850863262

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *