मुक्ता भागवत हिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड…
बुद्धिबळ स्पर्धेत एसपीएम शाळेचे यश
चिपळूण – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी व तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन समिति चिपळूण यांचेवतीने चिपळूण तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा 2026 यूनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे नुकत्याच संपन्न झाल्या.
या स्पर्धा 14 व 17 वर्षाखालील मुले , मुली अशा गटवार घेण्यात आल्या. तालुकास्तरीय 17 वर्षाखालील मुली या गटामध्ये कु. मुक्ता दिगंबर भागवत हिने 4 था क्रमांक प्राप्त केला असून जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. कु. मुक्ता ही एस् पी एम इंग्लिश मीडियम स्कूल परशुराम या शाळेतील इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी आहे. ती सध्या श्री. वैभव गुरव यांचेकडे बुद्धिबळाचे धडे घेत आहे. या यशाबद्दल तिचे शाळेत व सर्वत्र कौतुक होत आहे.
मुक्ता भागवत हिच्याबरोबरच स्मित लकेश्री याचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याचेही कौतुक करण्यात येत आहे.

