वैभव!
*वैभव!*
रेल्वेइंजिन थांबले..
खांब तळ्याकाठी..
सहज उतरलो तळ्यात..
कमळ पाहून प्रसन्न वाटले..
कमळासाठी सरसावलो..
तोच कानावर ‘राम, राम’ पडले..
कोणी दास जप करत होता..
त्याने हातानेच खुणावले..
कमळ मिळवणे सोपे नाही..
विरोधाचा ‘भ्रमर’ आत आहे..
नशिबात मोठी प्रतीक्षा आहे..
थोडा धीर धर..
कमळ तुझ्या हातात असेल..
दासाचे शब्द खरे ठरले..
अखेर हातात कमळ आले..
पण, इंजिनाचे ‘वैभव’ झाकोळले..
इंजिन बंद पडले..
कमलदलाने जखडून ठेवले..
खांब तळ्यातच अस्तित्व राहिले..
इच्छा बरीच आहे..
राज्यस्तरीय तळ्यात जावे..
पण, देवेंद्र आणि रवींद्र
यांच्या मनातले कसे जाणावे..
तळे आटण्यापूर्वी तरी..
नेतृत्वाला वैभव प्राप्त व्हावे ! वैभव प्राप्त व्हावे !!
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262

