पालक(?)मंत्रीपद!
*पालक(?)मंत्रीपद!*
साक्षात शिवप्रभूंच्या
वास्तव्याने, शौर्याने
पावन झाला रायगड…
‘रायगड’च्या केवळ उच्चाराने…
अंगावर उभे राहतात रोमांच…
राजांनीही केले राजकारण! पण, ते स्वराज्यासाठी…
हा झाला इतिहास…!
त्याच पवित्र भूमीत
आज पट मांडलाय
स्वार्थी, सत्तापिपासू राजकारणाचा…
उठता- बसता, तोंडी लावायला
शिवप्रभूंचं नाव…
जो तो मारतोय सत्तेवर ताव…
‘पालक’ होण्यासाठी
दीड वर्ष चालला डाव – प्रतिडाव…
‘राजधानी रायगड’च्या डागडुजीतही
जिथे होतो भ्रष्टाचार…
तिथे कोणी झाला ‘पालक’ म्हणून सर्वसामान्यांना काय पडतो फरक?
आजच्या राजकारणाचे एकच कटू सत्य…
ज्याला त्याला आपलाच वारसदार प्रिय! आपलाच वारसदार प्रिय!!
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262

