वाशिष्ठी डेअरीची तपासणी.. दूध आणि तुपाचे सॅम्पल

वाशिष्ठी डेअरीची तपासणी.. दूध आणि तुपाचे सॅम्पल

*कोकण रिपोर्टर ब्रेकिंग*

 

## *वाशिष्ठी डेअरीची तपासणी*

## *मंचर दूध भेसळ प्रकरणानंतर अन्न प्रशासन ऍक्टिव्ह*

## *20 ते 25 मुद्द्यावर आधारित कायमस्वरूपी तपासणीचे आदेश*

 

रत्नागिरी – मंचर येथील दूध भेसळ प्रकरणानंतर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध उत्पादन आणि संबंधित प्रक्रिया उद्योगांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने चार दिवसांपूर्वी चिपळूण येथील वाशिष्ठी मिल्क मॅन्युफॅक्चरिंग युनिटची तपासणी करण्यात आली असून येथील दुधाचे दोन सॅम्पल आणि तुपाचे एक सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तसेच रत्नागिरी शहरातील श्रीनाथ डेअरी येथे तपासणी करून दही व आईस्क्रीम यांचे अन्ननमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. रत्नागिरी शहरातील श्री गणेशनाथ पनीर उत्पादक आणि विक्रेते यांच्याकडे देखील तपासणी करून पनीरचे सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत. या आस्थापनांच्या कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली आहे. नवीन आलेल्या मिल्क ऑर्डर नुसार तपासणी केली जाईल व पुढील कामकाज चालू असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार डेअरी उद्योगाच्या अनेकविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येत आहेत. ही प्रक्रिया नियमित चालू ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *