19 जूनला ‘व्हिजन3 न्यूज’ चा वर्धापनदिन सोहळा!

19 जूनला ‘व्हिजन3 न्यूज’ चा वर्धापनदिन सोहळा!

व्हिजन थ्री न्यूजच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त

लोकप्रेरणा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

चिपळूण – येथील व्हिजन थ्री न्यूजच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त लोकप्रेरणा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या दहा व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

शुक्रवार दिनांक 19 जून रोजी खेंड येथील माऊली लॉन्स सभागृहात संध्याकाळी 4 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री. शेखर निकम, नगराध्यक्ष श्री. उमेश सकपाळ, सह दुय्यम निबंधक वर्ग 2 श्रीमती स्मिता गुरनुले, ज्येष्ठ पत्रकार श्री. सतीश कदम आणि माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रमाकांत पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये श्री. महादेव दत्ताराम चव्हाण यांना लोकप्रेरणा जनसेवा गौरव पुरस्कार, श्री भास्कर रामचंद्र कदम यांना लोकप्रेरणा ज्ञानरत्न पुरस्कार, श्री. प्रमोद शंकर ठसाळे यांना लोकप्रेरणा प्रशासकीय रत्न पुरस्कार, श्री. प्रकाश अनंत गांधी यांना लोकप्रेरणा सामाजिक सेवा गौरव पुरस्कार, श्री. विलास दत्ताराम महाडिक यांना लोकप्रेरणा कोकण गौरव पुरस्कार, श्री. मकरंद माधव भागवत यांना लोकप्रेरणा निर्भीड लेखणी गौरव पुरस्कार, श्री. नयनिश रमेश गुढेकर यांना लोकप्रेरणा पक्षीमित्र गौरव पुरस्कार, श्री. सतीश रजनीकांत जाधव यांना लोकप्रेरणा मनोदीप ज्ञानगौरव पुरस्कार, श्रीमती रंजिता विजय ओतारी यांना लोकप्रेरणा नारी शक्ती गौरव पुरस्कार, श्री. अनिकेत सुधीर जाधव यांना लोकप्रेरणा युवा गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत.

याच सोहळ्यामध्ये व्हिजन थ्री न्यूजचे संपादक श्री. राजेंद्रकुमार शिंदे यांचा सुवर्णंमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्हिजन थ्री न्यूज परिवार, राजेंद्रकुमार शिंदे वाढदिवस अभिष्टचिंतन समिती आणि मित्र मंडळ यांनी केले आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *