घोडेबाजार!

*घोडेबाजार!*

 

निवडणूक विधानपरिषदेची…

कोंबडी सोन्याची अंडी देणारी…

 

सहा वर्षांनी येणारी…

सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!!

 

सर्वांनाच प्रतीक्षा मोठी…

‘तटा’ आतील खजिन्याची…

 

माने या न माने, पण…

अनेकांनी स्वप्नं पाहिली…

निवडणूक होणार म्हणून…

अधिक खात्री वाटली…

 

पण, अहो आश्चर्यम!

‘बाळ’ अचानक ‘पोक्त’ झाला…

घोडेबाजार टाळण्याचा पण केला…

 

आता गंमत अशी की,

‘एक’च घोडा विकला गेला…

कमळाबाईला ‘लंबी रेस’ का वाटला…

 

बाकीचे हजार घोडे…

पागेतच फुर्फुरत उभे…

मनाशी आणि आपसात म्हणतायत…

सहा वर्षांनी असलो तर बरे! असलो तर बरे!!

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

मो. 9850863262

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *