चिपळूण येथे पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन…

चिपळूण येथे पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन…

चिपळूण येथे ३ मे रोजी जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन

 

चिपळूण : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजता कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल, चिपळूण येथे होणार असल्याची माहिती अध्यक्ष मोहन मिरगल यांनी दिली.

 

स्पर्धेत प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये, तर तृतीय पारितोषिक १० हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. तसेच इतर वैयक्तिक पारितोषिके आणि सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

 

या उपक्रमासाठी श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कापसाळ (ता. चिपळूण), सौ. कांचन शिंदे (नगरसेविका) आणि श्री. सुमित शिंदे यांनी प्रायोजकत्व दिले आहे.

 

अधिकाधिक संघांनी सहभागी व्हावे तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्र दिनाचा उत्साहात आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मोहन मिरगल, कार्याध्यक्ष रमण डांगे, सचिव प्रभंजन पिंपुटकर व खजिनदार चंद्रशेखर सावले यांनी केले आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *