चिपळूण पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारनामा…

चिपळूण पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारनामा…

*# मर्जीतील ठेकेदारासाठी टेंडर मध्ये विचित्र अट…*

*# चिपळूण न. पा. पाणीपुरवठा विभागाचा कारनामा…*

 

चिपळूण : चिपळूण नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा नवीन कारनामा समोर आला आहे. आपल्या मर्जीतील ठेकेदार नेमता यावा यासाठी आजपर्यंत लागू असलेल्या अटी व शर्तीत नव्याने भर घालण्यात आल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळातून ऐकण्यास मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चिपळूण नगरपालिकेने पाणीपुरवठा विभागासाठी एक वर्ष मुदतीकरता पाणी व्यवस्थापन सेवा पुरवणे या कामासाठी (1कोटी 63लाख 33हजार, 200रु.)16/04/2026 रोजी ऑनलाईन टेंडर प्रसिद्ध केले. या ऑनलाईन निविदेचा टेक्निकल पार्ट उघडणेचा कालावधी 29/04/2026 रोजी सायंकाळी पाच वाजता आहे.

या प्रकारचे काम करण्यासाठी आजपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवांशी संबंधित व्यवस्थापन सेवा पूरविल्याचा अनुभव पुरेसा होता. मात्र, यावेळी यात जाणीवपूर्वक आरोग्य विभागाशी संबंधित अनुभवाची अट वाढविण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागातील तांत्रिक कामाचा आणि आरोग्य विभागातील अनुभवाचा नेमका काय संबंध हे एक कोडेच असून ते चिपळूण पालिकेने तयार केले आहे.

 

# *निहार कोवळे काय करणार?*#

 

चिपळूण पालिकेचे तरुण, तडफदार पाणीपुरवठा सभापती निहार कोवळे हे नेहमीच अन्याय आणि भ्रष्टाचार याविरोधात आक्रमकपणे लढत असतात. सभापती झाल्यावर त्यांनी पाणीपुरवठा विभागाचा कारभार पाण्यासारखाच स्वच्छ करण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे कोवळे हे या प्रकारची गंभीर दखल घेतील आणि काम मॅनेज करण्याच्या, मार्जितील ठेकेदार आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न हाणून पाडतील अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *