अखेर एसपी तुषार दोशी यांची सांगलीला बदली!

अखेर एसपी तुषार दोशी यांची सांगलीला बदली!

*साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांची अखेर बदली*

*सातारा-* साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यामुळे वादात अडकलेले साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. गृह विभागानं पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये तुषार दोशी यांचा समावेश आहे. सातारा जिल्हा परिषदेतील राड्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज साताऱ्यात जाहीर सभा होणार आहे. नेमक्या याच दिवशी तुषार दोशी यांच्या बदलीचा आदेश जारी झाला आहे. आता पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे हे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.

 

सातारा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या दिवशी जे काही घडलं ते शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालत यावर तातडीने पक्ष म्हणून महायुतीत हे पुन्हा होऊ नये यासाठी कठोर भूमिका घेण्यात यावी, असे सांगितले होते. सभागृहात शिवसेनेने रणनीती ठरवत सातारा पोलीस अधीक्षकांना या सगळ्या गोंधळानंतर निलंबनाचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात दिले होते. त्यावर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय गंभीर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सगळा प्रकार मांडला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर आज तुषार दोषी यांची बदली सांगलीला करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्या दरम्यानच बदली झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

 

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *