दम असेल तर…

*दम असेल तर…*

 

दम असता तर

तुतारी शेवटपर्यंत फुंकली असती,

बुजुर्ग योद्ध्याची

साथ कधीच सोडली नसती…

 

ईडीला घाबरून

वॉशिंग मशीनचे

पाय धरले नसते,

जबरदस्तीने पाठी लागून

कमळात लपले नसते…

 

दम असेल तर अजूनही

सखोल चौकशीला सामोरे जा,

बुडणाऱ्याला स्थगितीचा

काडीचा आधार कशाला?

दरेकर-भोयरचा जयजयकार कशाला?

 

करोडो रुपयांत लोळण्यासाठी

नेमका कोणता व्यवसाय केला?

दम असेल तर

इन्कम टॅक्सला चार दिवस घरी बोलवा…

 

आम्ही जमिनीवर आहोत,

तेच आम्हाला पुरे आहे,

घोटाळ्याच्या काळ्या पैशावर

आम्हाला उडायचंच नाही,

लोकं विसरली तरी

आम्हाला फिकीर नाही…

 

आम्हाला धमकावण्याच्या

फंदात पडू नका,

जन्म आमचा

या लाल मातीतलाच…

प्रसंगी लेखणी मोडून

बाण करण्याची प्रेरणा

बाळासाहेबांकडून घेतली आहे…

 

धमक्या कितीही दिल्या

तरी मरणाला घाबरत नाही,

गरीब असलो तरी

स्वाभिमान कधीच सोडत नाही…

 

इंटेरिअर नसतं केलं तर

इथपर्यंत आलाच नसता,

सासऱ्यांचा आधार मिळाला—

हेच नशीब समजा…

 

स्वतःला अर्जुन समजत असाल तर

ईडी, इन्कम टॅक्स, चौकशी संस्थांना

निडरपणे सामोरे जा…

 

पण तुमच्यात तो दम नाही…

आणि असेलच तर—

एकच करा—

याक्षणी कमळाच्या विरोधात उभे रहा,

स्वाभिमानाने तुतारी हाती धरा…

 

आम्ही त्याक्षणी

लेखणी खाली ठेवू…

खाली ठेवू!!

 

*— मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण*

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *