खेरशेत टोलनाका परिसर झाला सुरक्षित!

सावर्डे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आबासाहेब पाटील यांचा पुढाकार… वाहनचालकांतून समाधान व्यक्त!

चिपळूण : तालुक्यातील खेरशेत टोल नाका येथे बसविण्यात आलेले रस्ता दुभाजक अनेकदा वाहन चालकांना समजत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. सदरची गंभीर बाब सावर्डे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या निदर्शनास अनेकदा आली. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या निदर्शनास ही बाब आणली. या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन राष्ट्रीय महामार्गाचे शहाबुद्दीन हे आपल्या टीमसह खेरशेत टोलनाका येथे दाखल झाले. स्वतः आबासाहेब पाटील हेही जातीने हजर होते. येथे दुभाजक दिसत नसल्यामुळे प्रथमतः दोन्ही बाजूस रेडियम, वळण दाखवणारे सूचनाफलक तसेच टोलनाका येण्यापूर्वी काही अंतरावर सूचना आदींसारख्या आवश्यक उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी केली. याकामी सावर्डे पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

यामुळे महामार्गावरती वाहनचालक थेट येऊन येथे धडकण्याचे प्रमाण पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे. यावेळी अनेक वाहनचालकांनी थांबून आबासाहेब पाटील आणि राष्ट्रीय महामार्गाचे आभार व्यक्त केले.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

One thought on “खेरशेत टोलनाका परिसर झाला सुरक्षित!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *