डॉ. अब्बास जबले यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद…
*IMA चिपळूणचे अध्यक्ष डॉ. अब्बास जबले यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद*
मी मागच्या आठवड्यात आणि आज ‘चिपळूणमधील डॉक्टर्स रुग्ण भेटीच्या वेळा पाळत नसल्याबद्दल (इमर्जन्सी सोडून) आणि फोनवरून अपॉइंटमेंट न देण्यामुळे खेडपाड्यातील रुग्ण, नातेवाईक यांचे होणारे हाल’ याबाबत सोशल मीडियावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्ण, नातेवाईक आणि एकूणच जनतेतून मिळणारा प्रतिसाद डॉक्टरांनी विचार करावा असा आहे.
मात्र, आणखी एक समाधानाची बाब म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनचे चिपळूणचे अध्यक्ष डॉ. अब्बास जबले यांनी याबाबत माझ्याशी संपर्क साधून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या मुद्द्यावर येत्या आठवड्यात चर्चा करुन काय सुधारणा किंवा उपाययोजना करणे शक्य आहे ते पाहू असे आश्वासित केले आहे. त्याचबरोबर डॉक्टर – सिटीझन फोरमच्या माध्यमातून लवकरच एक बैठक आयोजित करणार असल्याचेही डॉ. जबले यांनी सांगितले आहे. या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहून चर्चा व्हावी व समज गैरसमज दूर व्हावेत, चांगले सजेशन मिळावेत अशी त्यामागची भूमिका आहे.
डॉ. जबले यांच्याबरोबरच मी स्वतः डॉक्टरांच्या अन्य संघटना अध्यक्षाना भेटून चर्चा करणार आहे.
या सर्वांतून आपल्याकडचे डॉक्टर्स आणि पेशन्ट यांच्यात विश्वासाचे, सौहार्दाचे वातावरण कायम रहावे असा हेतू आहे.
आपला,
मकरंद भागवत,
पत्रकार, चिपळूण.

