चिपळूणमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी मोफत मेडिकल प्रवेश मार्गदर्शन सेमिनार

चिपळूणमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी मोफत  मेडिकल प्रवेश मार्गदर्शन सेमिनार

चिपळूणमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी मोफत

मेडिकल प्रवेश मार्गदर्शन सेमिनार

 

चिपळूण : मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी श्रेया एज्युकेअर यांच्या वतीने मोफत प्रवेश मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मेडिकल अॅडमिशनच्या जटिल प्रक्रियेतून योग्य मार्ग काढण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना योग्य पर्याय निवडण्यास मदत व्हावी, या उद्देशाने हा सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.

 

या मार्गदर्शन सेमिनारमध्ये अनुभवी तज्ज्ञांकडून योग्य कॉलेज व कोर्स निवडण्यासाठी विशेष मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या गुणांनुसार योग्य पर्याय सुचविण्यासाठी वैयक्तिक समुपदेशन, तसेच योग्य रणनीतीमुळे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशाची संधी वाढविण्याबाबत माहिती दिली जाणार आहे.

 

तसेच संपूर्ण प्रवेश प्रक्रिया समजावून सांगितल्याने वेळेची बचत होणार असून विद्यार्थी व पालकांची अॅडमिशनबाबतची चिंता कमी होण्यास मदत होणार आहे. मेडिकल प्रवेशा संदर्भातील अद्ययावत माहिती, योग्य कॉलेज व फी स्ट्रक्चरची माहिती देऊन आर्थिक नियोजनासाठीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

हा सेमिनार शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

 

स्थळ : हॉटेल अभिरुची सेमिनार हॉल, मुंबई-गोवा हायवे, चिपळूण, जि. रत्नागिरी.

 

मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या मोफत समुपदेशनासाठी नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

संपर्क : मोबाईल नं. 9890222785 / 7020352480

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *