संस्थेत 10 कोटींचा घोटाळा? कर्मचारी वेठीला?

*कोकण रिपोर्टर ब्रेकिंग*

 

*संस्थेत 10 कोटींचा घोटाळा? पत सांभाळण्यासाठी कर्मचारी वेठीला?*

 

चिपळूण: नाव मोठे, घोटाळेही मोठे आणि चौकशीच्या स्थगितीसाठी वशिलेही मोठे अशा कारणास्तव गेली काही वर्ष गाजत असलेल्या एका संस्थेत जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील शाखेत दोन ठिकाणी तब्ब्ल दहा कोटींचा घोटाळा झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

या दोन शाखांच्या व्यवस्थापकांनी गुंतवणूकदारांचे तब्ब्ल दहा कोटी परस्पर काढल्याचे निदर्शनास आल्यानंतर संस्थेने खरं तर संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार देणं अपेक्षित असताना तो मार्ग न अवलंबता हे पैसे वसुल करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून त्यातून ही अफराताफर सेटल करण्यासाठी ‘सर्वेसर्वा’ असलेल्यांकडून दबाव येत असल्याचे तसेच कर्जासाठी तयार न झाल्यास त्रासदायक ठरतील अशा ठिकाणी बदल्या करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे कळते.

या सर्व प्रकारामुळे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय तणावाखाली असल्याचे समजते. यापूर्वीही अनेक कर्मचाऱ्यांच्या नावावर लाखो रुपयांची कर्ज काढून तो पैसा आलिशान राहणीमानासाठी वापरण्यात येत असल्याचे बोलले जाते.

दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात काही लोकांनी संस्थेच्या गैरव्यवहाराबाबत उपोषण केले होते त्यानंतर चौकशी लावण्यात आली होती, मात्र त्याला स्थगिती मिळावी म्हणून सर्वेसर्वानी पुरोगामी विचार सोडून प्रखर हिंदुत्व स्वीकारले.

या संस्थेतील गैरकारभाराच्या सुरस कथा ऐकून ‘ बडा घर पोकळ वासा ‘ अशी परिस्थिती असल्याचे तज्ञाना वाटते. आज ना उद्या हा फुगा फुटणार आहे मात्र त्यात कर्मचारी आणि गुंतवणूकदार भरडले जाऊ नयेत, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वांनी सावध होण्याची अपेक्षा अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *