राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त प्रभातफेरी उत्साहात!
*चिपळूणमध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त प्रभातफेरी उत्साहात..*
*पालिका, आरोग्य विभाग आणि जर्नालिस्ट असो.चा सहभाग..!*
*चिपळूण- तालुका आरोग्य विभाग, चिपळूण नगरपरिषद आणि जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी राष्ट्रीय डेंग्यू दिन विविध स्तुत्य उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरात प्रभातफेरी काढून डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यात आली* .
चिपळूणच्या वडनाका भागात असलेल्या नागरी आरोग्य केंद्रापासून चिपळूण पालिकेपर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीचा शुभारंभ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेचे लोकप्रिय आरोग्य सभापती शुभम पिसे व जर्नालिस्ट असो.चे अध्यक्ष पत्रकार सुनील साळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
प्रभात फेरीत पालिकेचे पाणीपुरवठा सभापती निहार कोवळे, नगरसेवक संदीप भिसे, जर्नालिस्ट असो.चे उपाध्यक्ष राजेंद्रकुमार शिंदे,गजेंद्र खडपे, सचिव योगेश बांडागळे, सदस्य ललेश कदम,वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी म्हापदी,आदिती पटवर्धन, संजीवनी नर्सिंग कॉलेजच्या नयना तांबे, आरोग्य निरीक्षक सुनील जानवलकर, सुजित जाधव, प्रवीण जाधव यांच्यासह आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी तसेच संजीवनी नर्सिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरी आरोग्य केंद्राच्या आवारात यानिमित्ताने रांगोळी प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
जनतेच्या निरामय आरोग्यासाठी
कटिबद्ध – सभापती शुभम पिसे
चिपळूण पालिकाच्या प्रांगणात प्रभातफेरी आल्यानंतर आरोग्य सभापती श्री. शुभम पिसे यांनी शहरातील जनतेच्या निरामय आरोग्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनीही डेंग्यू होऊ नये म्हणून करावयाच्या उपायोजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी नगरसेवक साजिद सरगुरोह हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य निरीक्षक श्री. अभिजीत यादव व आरोग्य कर्मचारी इकबाल चौगुले यांनी केले.जिल्हा परिषदेच्या सीईओ वैदही रानडे, मुख्याधिकारी संजय जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

