घरडा वाचनालयाची कार्यकारिणी जाहीर…

घरडा वाचनालयाची कार्यकारिणी जाहीर…

*घरडा वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा

उत्साहात संपन्न*.

चिपळूण : शहरातील घरडा वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा ट्रेंड सेंटर येथील कार्यालयात उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. गिरीश बांदिवडेकर होते. मागील वर्षाचा आढावा कोषाध्यक्ष श्री. विनायक ओक यांनी सादर केला व तो एकमताने मंजूर करण्यात आला.

वाचनालयासाठी स्वतंत्र व प्रशस्त जागेची गरज व्यक्त करताना उपाध्यक्ष श्री. प्रकाश काणे यांनी घरडा उद्योग समूहाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून , ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.यावेळी वाचनालय नविन जागेत स्थलांतर करण्यात एकमताने मान्य करण्यात आले.शहरातील डॉ. यतिन जाधव यांच्या भरीव आर्थिक सहकार्यातून व त्यांच्याच नविन जागेत स्थलांतर करण्याबाबत सर्व सभासदांनी एकमताने मान्यता देऊन, डॉ. यतिन जाधव यांच्या योगदाना बद्दल अभिनंदन व कृतज्ञता व्यक्त केली.

जाधव परिवाराच्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर वाचनालयाचे नामकरण श्रीमती. विभा अरविंद जाधव करावे अशी सुचना श्री. धनंजय चितळे यांनी केली.त्या प्रमाणे ,डॉ. यतिन जाधव यांच्या मातोश्री श्रीमती. विभा व वडील कै. अरविंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचनालयास *‘विभा अरविंद ग्रंथालय’* असे नामकरण करण्यात आले.त्यानंतर नविन कार्यकारणी स्थापन करण्यात आली. अध्यक्षपदी श्री. प्रकाश काणे यांची एकमताने निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली: अध्यक्ष – श्री. प्रकाश काणे, उपाध्यक्ष – डॉ. वैशाली जाधव, कार्यवाह – श्री. विजय कदम, कोषाध्यक्ष – श्री. विनायक ओक, सदस्य – श्री. प्रसाद रिसबुड, प्रा. विकास मेहेंदळे, डॉ. सौ. राजश्री सोमण, सौ. गौरी भोसले, सौ. मेघा बेटकर श्री. प्रकाश गांगण, श्री. सुरेश चव्हाण आदीचा समावेश करण्यात आला.मावळते अध्यक्ष श्री.गिरीश बांदिवडेकर यांनी नविन कार्यकारिणीचे व उपस्थित सर्व सभासदांचे व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सभेला डाॅ. अरविंद पोतदार ,श्री. सुनील खेडेकर, सतीश विरकर राष्ट्रपाल सावंत, डॉ. माधव सोमण यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *