रत्नागिरी पोलीस अधीक्षकांचा गौरव!

रत्नागिरी पोलीस अधीक्षकांचा गौरव!

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षक

नितीन बगाटे यांचा गौरव

 

रत्नागिरी, दि. २८ : दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या मूल्यमापनात २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात पाचवे स्थान मिळविले.

 

बगाटे यांनी ‘मिशन जीवन’, ‘रेड्स ॲप’, ‘मिशन गती’, ‘रत्नसेतू चॅटबॉट’सह २४ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस यंत्रणा अधिक तंत्रस्नेही व लोकाभिमुख केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने हा सन्मान केला.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *