ओळखा पाहू… मी कोण?

*ओळखा पाहू…मी कोण?*

 

संस्था आहे म्हणून पत आहे…

पैसा आहे म्हणून जनमत आहे…

दूध आहे म्हणून मलई आहे…

 

मूर्ती लहान, पण ऍटीट्युड मोठा आहे…

इस्त्री कडक, पण मन छोटं आहे…

वैचारिकतेचा शो आहे…

पक्षबदलाचा स्वार्थ आहे…

 

छोट्याशा टिकेतूनही मुळापासून हलतो आहे…

वास्तवापासून पळतो आहे…

मीडिया स्वातंत्र्याच्या नुसत्याच गप्पा…

प्रत्यक्षात सर्वांना विकत घेऊ शकतो चा माज आहे…

मला हवं तसंच छापा चा अट्टाहास आहे…

 

पवार साहेब गुरु, पण संयमाचा- खिलाडूपणाचा सपशेल अभाव आहे…

 

सबसिडीचा गॅस भरतो आहे…

कोट्यवधीचा फुगा फुगतो आहे…

आर्थिक विकास वेगात आहे…

कुबेराशी स्पर्धा जोरात आहे…

 

शेवटी पेटली ईडीची काडी…

म्हणून गेलो इंद्राचरणी…

आणि करायला घेतली कमळाची शेती! कमळाची शेती!!

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण

मो. 9850863262

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *