रत्नागिरी विमानतळ येत्या तीन महिन्यात कार्यान्वित होणार!

रत्नागिरी विमानतळ येत्या तीन महिन्यात कार्यान्वित होणार!

*रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यात

विमानाचे टेकऑफ – ना. उदय सामंत*

 

रत्नागिरी – रत्नागिरीच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी गती देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण आज उजाडला. भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात आज सामंजस्य करार स्वाक्षरी करण्यात आला. या करारामुळे रत्नागिरी विमानतळाच्या ७५ टक्के यशस्वी टप्पा पूर्ण झाला असून, येत्या तीन महिन्यांत रत्नागिरी विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ होईल, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे केली. तसेच, पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात रत्नागिरीमध्ये पंचतारांकित हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.*

आयोजित या विशेष करार प्रसंगी जि.प. अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, एमआयडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, आयसीजीएएसचे कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, माजी आमदार विनय नातू, उद्योजक दीपक गद्रे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *