पाचशे कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
*भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चिपळूण- संगमेश्वरमधील सुमारे ५०० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश*
*खासदार नारायणराव राणे यांनी केले प्रवेशकर्त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत*
चिपळूण (प्रतिनिधी):– चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचे खा. राणे यांनी भाजपात उत्स्फूर्तपणे स्वागत करीत पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली.
गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रशांत यादव यांनी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसमवेत भाजपात प्रवेश केला. तिथपासून यादव चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे मंगळवारी चिपळूणमध्ये जन
ता दरबाराच्या निमित्ताने आले होते. यावेळी भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यामध्ये कळकवणे ओवळी, आकले, स्वयंदेव, नादिवसे, असुर्डे ,दहिवली, पेढे,पाली, पाचाड, मालदोली, मार्गताम्हाणे, आंबतखोल, हडकणी धनगरवाडी, मिरजोळी , शिरगाव, गिमवी, कापरे,कालूस्ते, कोळकेवाडी, कान्हे, खडपोली, गाणे, दादर, नारदखेरकी, तिवडी तसेच संगमेश्वर- देवरुख येथील कोंडीवरे, कोसुंब, कुचांबे, कुडवली, देवरुख, आंबवली येथील देखील कार्यकर्त्यांचा प्रवेशांमध्ये समावेश आहे. पिंपळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश मोरे, कान्हे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गंगाराम पवार, तसेच चिपळूण येथील ऍड, वासंती दाभोळे ऍड. सुमित जोंधळे यांचा देखील प्रवेश झाला आहे.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव, भाजपा उत्तरात्मक जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, माजी नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, सौ. सुप्रिया उतेकर, सौ. दीप्ती महाडिक, सौ. रुही खेडेकर, सौ. अंजली कदम, सौ. प्रणाली सावर्डेकर आदी उपस्थित होते.
